💥मी राबविलेला बाल आनंद दिन💥 🙏�बालपण देगा देवा जसा मुंगी साखरेचा रवा। ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार🙏 🔆कालावधी 15जुन ते 15 जुलै ✳उद्दिष्टे➡ 1⃣पुर्नरचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 चा मुळ उद्देश क्रुतियुक्त अध्यापनावर भर. 2⃣22 जुन 2015 चा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या जीआर नुसार बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानरचनावादावर भर. 3⃣ विद्यार्थ्यांच्या अभिरूचीनुसार शिक्षण उदा.एखाद्या विद्यार्थ्याला चित्रकलेत आवड असेल तर त्याच्या अभिरूचीनुसार त्याला पुढे त्याच शिक्षणात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न. 4⃣कला,कार्यानुभव सारख्या उपेक्षित विषयांना वर्षाच्या सुरवातीला च महत्वाचे स्थान. 5⃣शिक्षणाचा मुळ उद्देश आनंददायी,शिस्तबध्द व भयमुक्त वातावरणात मुलांचा सर्वांगीण विकास 6⃣वर्षाच्या सुरुवातीलाच शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी बालदिन निमीत्ताने शाळेस एक दिवस जत्रेचे स्वरुप आणि जत्रा कोणास आवडत नाही.
🎻उपक्रमाची कार्यवाही🎻
आपल्या कार्यक्षेत्रातील एक शाळा निवडून सुरवातीला च शिक्षक सभा घेऊन त्यांना उपक्रमाची रूपरेखा सांगणे.त्यानुसार त्यापरिसरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना,शालेय व्यवस्थापनाच्या अध्यक्षांना,लोकप्रतिनिधी व गटातील अधिकारी यांना निमंत्रीत करणे.व शाळेच्या पुर्णवेळात कार्यक्रम घेणे. 🎊सुरवातीला च विद्यार्थी आलेल्या पाहुण्यांचे ,शिक्षकांचे स्वागत फ्रेंडशिप बेल्टने करतील म्हणजे सर्वांचे मित्रत्वाचे नाते निर्माण होईल. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्टाँल असतील
1)चित्रकला
2)रांगोळी
३)मुखवटे।
4) मेहंदी
5)कार्यानुभव
6)गायन
7)न्रुत्य
8)कँरम
9)पेंटीग
10)इतर.
असे वेगवेगळे स्टाँल्स तयार करून प्रत्येक स्टाँल्स वर त्या विषयात रस असणारे एक शिक्षक/शिक्षीका नेमुन ज्या विद्यार्थ्याला ज्यात आवड असेल त्याने त्या स्टाँल्सवर जाऊन आपल्याला आवडत असलेली क्रुती करणे व नंतरच्या स्टाँलवर जाणे. व आपल्याला जे आवडेल ते करणे.दुपारच्या भोजनात शालेय पोषण आहारांतर्गत गोड जेवण झाल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ त्यात छान छान न्रुत्य,नाटीका,प्रत्येकाचे मुखवटे रंगवणे व शेवटी कार्यक्रम कसा वाटला याचे थोडक्यात वर्णन शाळेची घंटा वाजली तरी कोणी घरी जायचे नाव घेणार नाही एक प्रकार ची जत्राच....
🙏🙏 जेथे हात काम करतात तेथे हस्तकला,जेथे बुद्धी काम करते तेथे कौशल्य व जेथे हात व बुद्धी ह्दयापासुन काम करतात तेथे कलेची निर्मिती होते
🙏🙏 सादरकर्ती-वनिता वंजारी ठाणे
मनपा,विषयतज्ञ,ठाणे डाएट
प्रसिद्धी प्रमुख-श्री .मनोहर वाघ सर धुळे डाएट
.म यंंदा राबवणार ना आपल्या शाळेत👍👍
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा