*व्यथा विषयसाधनव्यक्तीची*
*************************
जीथे संपते,सर्वांची ऊक्ती ।
तीथे धावून जातो,विषयसाधनव्यक्ती,
हिच खरी माझी भक्ती,कधी होणार कंत्राटीची मुक्ती ।।
वाड्यावस्त्यावर,लांबवर न्यावी गुणवत्ता ।
साधनव्यक्ती गिरवितो आपली मार्गदर्शनाची सदैव कित्ता ।।
आईचा हात सोडून विस्वासाने दिलेला मुल,।
त्याला विविध अनुभवाच्या रंगछटाने साधनव्यक्ती ठेवतो नेहमी कुल ।।
दूर्गम,अपरिचित,टोकावरच्या गावखेड्यात फिरलो ।
विद्यार्थी,शिक्षकबांधव,पालक, यांच्या सहकार्याने,कधी न हरलो ।।
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम महान।
ज्ञानरचनावाद,अध्ययन अनूभूतीे,प्रगतीचीच मला तहान ।।
अद् भूत,चिरंतन,सातत्य,जरी आवाक्याबाहेरचे आहे ।
तरी सर्व सवंगडी,आतुरतेने साधनव्यक्तीची वाट पाहे ।।
कायम न झाल्याने,मावळतीच्या दिशेने,अंधा-या पर्वताआड प्रकाश मावळला ।
भविष्य काय माझे?मुलांचे?परिवाराचे?पाहून साधनव्यक्ती सावलीत विसावला ।।
दहा वर्ष झाले,वेदना गगनचुंबी झाल्या ।
दाही दिशा,समस्या, साधनव्यक्तीच्या सुनामी सारख्या खळखळल्या ।।
आशा न संपली,लढण्याची,कायम होण्याची अजून ।
गुणवत्ता सदैव तेवत ठेविन,विशाल अंतकरनातून ।।
करेल शासन,आज नाही ऊद्या आपणास कायम ।
दगडालाही पाझर फुटेल,सहानुभूती,मानवतावादी कुठे मुरेल ।।
शब्दांकन✍
*चांगदेव सोरते विषयसाधनव्यक्ती भामरागड*
** प्रसिध्दी व प्रचार **
@ मनाेहर वाघ सर, विषय साधनव्यक्ती, पंचायत समिती शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र माेबाईल नंबर 9763236070
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा