सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

आमच्या प्रयत्नातील डिजीटल शाळा गाेरेगाव

गोरेगाव येथील विषयतज्ञ यांनी घातला नवा आदर्श(चिमुकलीच्या हस्ते पार पडले गोरेगाव डिजिटल शाळेचे उद्घाटन):(राहुल कळंबे)"यशाचे स्वप्न मनी धरून एक विजयस्तंभ रोवावा"या ओळिप्रमाने गोरेगाव येथील विषयतज्ञ यांनी तालुक्याची केंद्रीय शाळा डिजिटल करण्याचे ठरविले.त्याकरिता स्वतः गोरेगाव मधे फिरुन वातावरण निर्मिती केली.1महिना सतत हा उपक्रम राबवून 2 वर्गख़ोल्या आज डिजिटल करण्यात यश प्राप्त केले.सम्पूर्ण जिल्ह्यलाच् नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला दिशा देण्याचे कार्य गोरेगाव
विषयतज्ञ यांनी आज करुन दाखविले.       
  गोरेगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी शाळाच्या स्पर्धेत आपली शाळा टिकावी याकरिता केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय आहे. गो.ग.ठाकरे,सुनील ठाकुर,ठाकरे,सतीश,बहेकार,रहांगडाले या सर्व विषयतज्ञ मंडळी यांनी आणखी उरलेले 2 वर्ग डिजिटल करायचेच हा निश्चय केला."सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मक्सद नहीं मेरा इरादा है की सूरत बदलनी चाहिये" याप्रमाणे साध्या उद्घाटन सोहळ्यानी चिमुकलीला मानाचे स्थान मिडवून दिले.हे सर्व साहित्य तुझ्यासाठी आहेत हा विश्वास आपसुकच निर्माण झाला.
      सुट्टीच्या दिवशी देखील विषयतज्ञ         मंडळी वर्ग सुशोभिकरण करण्यात व्यस्त असायचे एजुकेशनल डाटा मिडविन्यास धडपड करीत होते. या सर्व प्रयत्नाला सुंदर साथ दिलेले समस्त गोरेगाव शाळेतील शिक्षकवृंद अधिकारीगण यांचे देखील कर्तुत्व उल्लेखनीय आहे.  विषयतज्ञ मंडळी यांनी लावलेले  गोरेगाव डिजिटल शाळेचे रोपटे वृधिंगत होवो.डिजिटल च्या दिशेने गोरेगाव चे एक पाऊल पुढे.

** लेखन व संकलन **
वनिता वंजारी, साधनव्यक्ती जिल्हा ठाणे
## प्रसिध्दी व प्रचार ##
@ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे,महाराष्ट्र 

manoharwaghsir.blogspot.in 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा