सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

रविवार, १७ एप्रिल, २०१६

भाषा लेखनविषयक नियम समजून घेऊया.

भाषा लेखनविषयक नियम समजून घेऊया.
    'प्रगत  शैक्षणिक  महाराष्ट्र' या मोहिमेचे मुख्य ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांना वाचन,लेखन व गणन या क्रिया व्यवस्थित करता आल्या पाहिजे.त्याला या क्रिया करता आल्या की तो अभिव्यक्त झाला पाहिजे हे होय.
      याला अनुसरूनच पायाभूत चाचणी व संकलित दोनच्या प्रश्नपत्रिकाही आहेत.
     भाषा विषयात  पायाभूत मघ्ये प्रश्न १ ला, शब्दांचे श्रुतलेखन,वर्ग २ री ते ५ वी साठी दहा शब्द पाच गुण ,तर वर्ग ६  वी ते ८ वी साठी बारा शब्द सहा गुण.
      प्रश्न २ रा उता-याचे श्रुतलेखन, वर्ग ३ री ते ५ वी साठी २४ शब्दांचा उतारा,तर वर्ग ६ वी ते ८ वी साठी ३६ शब्दांचा उतारा. येथे शब्द लेखननियमानुसार असेल तरच गुण द्यायचे होते.
        पायाभूत चाचणीनंतर साधनव्यक्ती म्हणून शाळा भेटी करत असतांना, मी श्रुतलेखनाकडे विदयार्थी व शिक्षकांचे विशेष लक्ष वेधायचो. मात्र विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर श्रुतलेखनात चुका करतात हे लक्षात आले. या विषयावर विद्यार्थी व शिक्षकांचे समुपदेशन करायचो.
     माझ्या या कामाला खरी दिशा मिळाली ती'शालेय नेतृत्व विकास प्रशिक्षणा नंतर. जालना जिल्ह्यात माध्यमिक शाळेंच्या मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण पार पडले. मी स्वत: Senior Tutor Facilitator असल्यामुळे मी STF ची भूमिका बजावली. प्रशिक्षणानंतर  प्रत्यक्ष अंलबजावणी पाहण्यासाठी STF यांनी शाळाभेटी करणे हा एक प्रशिक्षणाचाच भाग होता. मात्र जालन्यात मी एकच STF असल्यामुळे  जिल्हयातल्या ४८ शाळांना भेट देण्याची जबाबदारी माझ्यावर आली.
    या भेटी दरम्यान 'प्रगत  शैक्षणिक  महाराष्ट्र' याची प्रगती व चालू काम  भेट दिलेल्या शाळेतील पहावे असे  मा.श्री.सुरेशजी माळी साहेब उपसंचालक MSCERT पुणे यांनी आम्हास सुचविले होते.  या नुसार मी प्रत्येक शाळेत शिक्षक,मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधायचो, नव्हे  लेखनविषयक नियमाची माहिती अपवादात्मक शब्दांसह देत असे. मात्र येथेही मला असे जाणवले की एकतर विद्यार्थ्यांना लेखनविषयक नियम माहित नाही, काही ठिकाणी विद्यार्थ्यांना नियमांची माहिती आहे, पण अपवादात्मक शब्द माहिती नसल्याचे आढळले.यामुळे विद्यार्थ्यांत गोंधळ होत असल्याचे जाणवले.जसे,
    नियम: शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ असेल( दोन मात्रा असेल) तर उपांत्य इ- कार किंवा उ-कार -हस्व लिहावा. उदा.कविता,वकिली,महिना,सरिता,मेहुणा,तालुका इ. हा नियम सांगितल्यानंतर या नियमाला अपवाद असणारे  जसे:पूजा,गीता,समीक्षा,क्रीडा,परीक्षा असे शब्द सांगणे आवश्यक आहे.
      लेखनविषयक समुपदेशन करतांना  व शालेय नेतृत्व विकास प्रशिक्षणाची अंलबजावणी शाळाभेटी देतांना एका शाळेतील प्रसंग...मी व मुख्याध्यापक 'लर्निंग वाक्' करत इयत्ता ८ वी च्या वर्गात पोहचलो. मी व मुख्याध्यापक वर्गात मागे जाऊन बसलो.शिक्षक लेखनविषयक नियम सांगत होते.त्यांनी नियम फळ्यावर लिहला व त्याला अनुसरून शब्दही लिहले.
  नियम: शब्दातील  अकारांतापूर्वीचा इ-कार किंवा उ-कार दीर्घ लिहावा. उदा.खीर,पीठ,दीर,वीट,फूल,सून,मूल इत्यादी. शिक्षक हे सांगत होते,तेवढ्यात वर्गातील एक मुलगी उभी राहून म्हणाली, सर 'शब्दातील अकारांतापूर्वीचा इ-कार किंवा उ-कार दीर्घ लिहावा'. हा नियम आहे तर मग 'गणित' या शब्दाला इ- कार -हस्व का?  मुलीच्या  या प्रश्नाने वर्गात शांतता पसरली. शिक्षकही काही बोलेना.शांत उभा राहिले.नव्हे त्यांचा चेहरा पडल्यासारखा झालेला पाहून  त्या मुलीलाही आपण प्रश्न विचारू काही चूक तर नाही केली ना? असे तिच्या चेह-यावरून जाणवले.मला मुलीच्या चिकित्सक व चौकस वृत्तीचे स्वागत करावेसे वाटले.मी उभा राहून तिला म्हणालो, बेटा तुझे नाव सांग! यावर पूजा जाधव आपले तिने नाव सांगितले,मग मी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना म्हणालो मित्रांनो,आपण पूजा ताईचे टाळ्या वाजवून स्वागत करूया! सर्व वर्गभर टाळ्यांचा कडकडाट झाला.आता पूजाचा चेहरा खूलला, मात्र मराठीचे शिक्षक शांत उभा, मी सरांजवळ गेलो,सरांना म्हटलो सरजी, पूजाच्या प्रश्नाचे मी उत्तर दिले तर चालेल ? त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखऊन हो कार दिला व वर्गात मागे माझ्या जागेवर जाऊन बसले.
     भाषेतील शब्द चार प्रकारात वर्गीकरण होतात.
१) तत्सम शब्द -१४% ते१५%
     जे संस्कृत शब्द मराठीत संस्कृत भाषेतून जसेच्या तसे स्विकारले आहेत.त्यांना मराठी लेखननियम लावले जात नाहीत, त्यांना तत्सम शब्द म्हणतात.उदा:नागरिक,परिषद,अनिल,मंदिर,कुसुम,गणित,रसिक गुण,युग इ.
२)तदभव शब्द-१८% ते १९%
      जे शब्द संस्कृत मधूनच आले मात्र येता वेळेस तत्सम शब्दासारखे न येता आपले रूप बदलून मराठीत आले त्यास तदभव शब्द म्हणतात.
  उदा: उष्ण-गरम,कर्ण-कान, पर्न- पान, तनू- शरीर इ.
३) देशी शब्द
      मराठी भाषा शके ६०२ मध्ये शब्द रूपांनी आली,९०५ मध्ये वाक्य रूपात आली व ११८८ मध्ये ग्रंथ रूपात आली. मात्र येथील समाज काही शब्द वापरत होता. त्यांचा समावेश कोठेही नव्हता.म्हणजे जे शब्द तत्सम वा तदभव नाहीत किंवा परभाषीही नाहीत  व जे शब्द मूळ इथला समाज वापर होता त्यास देशी शब्द म्हणतात. उदा: चिमणी,पेंढी,डोळा,पोट,ओटी,झाडू इ.
४) परभाषी शब्द
     जे शब्द मराठीत इतर भाषांमधून आले त्यांना परभाषी शब्द म्हणतात.उदा.१)कोबी,टोपी- पोर्तुगीझ शब्द
२)आहारविहार,सेनापती- गुजराती शब्द
३)वजीर,हुकूम- अरबी शब्द इ.
     यातील तदभव शब्द, देशी शब्द व परभाषी शब्द लिहतांना आपण लेखनविषयक नियम लावतो मात्र तत्सम शब्द जसेच्या तसे संस्कृत मधून स्विकातलेले आहेत आणि गणित हा तत्सम शब्द आहे,म्हणून तो नियमास अपवाद आहे.
      हे मी सविस्तर विद्यार्थ्यांना सांगितले.हा अनुभव मी 'शालेय नेतृत्व विकास प्रशिक्षण' अंलबजावणी शाळा भेटीमुळे घेऊ शकलो.मला या शाळा भेटी करण्याची संधी मा.गोविंदजी नांदेडे साहेब संचालक MSCERT पुणे व मा.सुरेशजी माळी साहेब  उपसंचालक MSCERT पुणे यांनी दिल्याबददल मी त्यांचा आभारी आहे.
     एवढेच नव्हे तर  प्रगत  शैक्षणिक  महाराष्ट्र  अंतर्गंत केंद्र व तालुका स्तरावरील कार्यशाळेत शिक्षकांचे या विषयी समुपदेशन केले. त्यांनाही वरील माहिती दिली. प्रत्यक्ष शाळा स्तरापर्यंत शिक्षकांना माहिती दिली.
     जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथे प्रगतशी संबधीत  प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक वा शिक्षकांशी या विषयावर बोलण्यासाठी डॉ.विशालजी तायडे, डॉ.मंजूषा क्षिरसागर. प्रा.संजयजी येवते,प्रा.प्रमोदजी कुमावत ,प्रा.बटुळे सर्व जेष्ठअधिव्याख्याता डायट जालना ,डॉ.अचला जडे प्राचार्य डायट जालना यांनी  मला वेळोवेळी  बोलावले, बोलण्याची संधी दिली व  प्रेरणा दिली.या बददल मी सर्वांचा आभारी आहे.
    
  दादाभाऊ रामभाऊ जगदाळे
        साधनव्यक्ती
     गटसाधन केंद्र जाफ्राबाद
      अंतर्गत डायट जालना.
प्रसिद्ध माध्यम :-manoharwaghsir.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा