सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

सोमवार, ११ एप्रिल, २०१६

मजेदार गणित आध्यापन पध्दती

मग शतकातून 1 शंभर ची नोट घेतो  ( जसे नोट घेतो तसे शतक स्थानातून 4 ला रेघ/ मारून वर 3 लिहिणे) दुकानदाराकडून चिल्लर  10 च्या नोटा घेणे ( एक दुकानदार नेमायचा व त्याच्याकडे सर्व नाणी नोटा ठेवायच्या  )
  मग दुकानदार 10 च्या 10 नोटा देईल ( इथे 1 शतक=10 दशक) हे पण समजावणे ।विद्यार्थी मोजून घेतील व देतील याची खाञी करणे

मग त्या 10 नोटा दशक स्थानी ठेवतील
  मग मुलाला विचारायचे आता 6 रूपये देता येईल काय ?  उत्तर -नाही

मग आता पुन्हा काय करशील  ?

विद्यार्थी म्हणेल -आता 10 रूपयाचे चिल्लर /सुटे करू/ नाणी घेवु

मग दशक स्थानातून एक नोट घेणे ( घेतली की लगेच तिथे / क्रास करून वर 9 लिहिणे) व दुकानदाराकडून चिल्लर घेणे

मग दुकानदार 1-1 रूपयाचे 10 नाणी देईल व नोट घेईल ।

इथे 1 दशक = 10 एकक हे  समजावणे

10 नाणी एकक घरात ठेवणे  ।
एकक घरात अगोदरचे 2 क्रास / करून
2+10= 12 वर लिहिणे

आता मुलाला विचारायचे की  तु आता 6 रूपये देवू शकतो ना ?

उत्तर -होय

मग तो 6 रूपये खालच्या घरात देईल व उर्वरीत 6 नाणी  रेषेच्या खाली ठेवेल व 6-संख्या लिहील.

✍ आता दशक घरात 10 च्या 9 नोटा आहेत त्यातून 5 नोटा देईल म्हणजेच खालच्या घरात  देईल व उर्वरीत 4 नोटा रेषेच्याखाली ठेवेल व 4 संख्या लिहील;

✍ आता शतक घरात 3 शंभर च्या नोटा आहेत
त्यातून 2 नोटा खालच्या घरात देईल व उर्वरीत 1 नोट रेषेच्या खाली ठेवेल व 1 संख्या लिहील  . 
मग खाली किती रूपये उरले असे मुलांना विचारायचे

शंभर 1 नोट-       100
दहाच्या 4-            40
एक रूपयाची -      06
--------------------+---------
                        146 रूपये उरले 

संख्या पण लिहिल्यामुळे 146 सांगतील

हे प्रात्यक्षिक वर्गातील मुलांकडून करून घेतले तर नक्कीच मुलांच्या
चेह-या वर ज्ञानाचा आनंद पाहावयास मिळेल व जी मुले 0 चा संबोध मध्ये अनेकदा चुका करतात त्यांचे संबोध स्पष्ट होईल 
प्रत्यक्ष व्यवहार कळेल
दैनंदीन जीवनाशी संबंध जोडला जाईल
गणिताची भीति दुर होईल व संपादणूकता वाढेल ;

हा उपक्रमाची अमलबजावणी मागील अनेक वर्षापासून चालु आहे .निश्चीतच गोड फळे चाखावण्याची संधी मिळतेय .
          ---=--------=----------=---------
दुसरा उपक्रम :-
🌹माझा वेगळा उपक्रम🌹
मुसा शेख
पं स :राजुरा
जिल्हा :चंद्रपूर

✍: ✍ नाणी व नोटांच्या साहाय्याने  संख्याज्ञान व गणिताच्या मुलभूत क्रियांचा संबोध स्पष्ट करणे व संपादणूकता वाढविण

✍: शाळाभेटी दरम्यान  विद्यार्थ्यांना दशक शतक हजार या स्थानाबाबत व वजाबाकी क्रियेमध्ये जास्त अडचणी जाणवत होत्या

0 चा संबोध स्पष्ट होत नव्हता 
    402
-- 256
  --------

असे उदाहरण सोडविताना मुले चुका करायची 

हे उदाहरण नाणी व नोटांच्या साहाय्याने घेवुन विद्यार्थ्यांचे संबोध स्पष्ट करण्यात आले

सदर उदाहरण फरशीवरील तळफळ्यावर चोकटीमध्ये घेण्यात आले

शतक स्थानी -
शंभराच्या 4 नोटा ठेवणे  व एकक स्थानी 2 नाणी

आता  मुलाला म्हटले  समज तुझ्याकडे 402  रूपये आहे  ।त्याच्यातून तुला  256 रूपये बाजुची (मुलगी/मुलगा) हिला द्यायचे तर तु काय करशील ??
अट ही की तु अगोदर चिल्लर दे  म्हणजे एककाकडून सुरू कर

मुलं विचार करतात

माझ्याकडे 2 रूपये चिल्लर व  6 रूपये द्यायचेय

मग काय करावे?

थोडी चालना दिली की
तुझ्याकडे 100 च्या नोटा आहेत ना   ;मग ??

मग मुलगा म्हणतो  100 रूपयाचे चिल्लर घ्यावे लागेल
✍: मग शतकातून 1 शंभर ची नोट घेतो  ( जसे नोट घेतो तसे शतक स्थानातून 4 ला रेघ/ मारून वर 3 लिहिणे) दुकानदाराकडून चिल्लर  10 च्या नोटा घेणे ( एक दुकानदार नेमायचा व त्याच्याकडे सर्व नाणी नोटा ठेवायच्या  )
  मग दुकानदार 10 च्या 10 नोटा देईल ( इथे 1 शतक=10 दशक) हे पण समजावणे ।विद्यार्थी मोजून घेतील व देतील याची खाञी करणे

मग त्या 10 नोटा दशक स्थानी ठेवतील
  मग मुलाला विचारायचे आता 6 रूपये देता येईल काय ?  उत्तर -नाही

मग आता पुन्हा काय करशील  ?

विद्यार्थी म्हणेल -आता 10 रूपयाचे चिल्लर /सुटे करू/ नाणी घेवु

मग दशक स्थानातून एक नोट घेणे ( घेतली की लगेच तिथे / क्रास करून वर 9 लिहिणे) व दुकानदाराकडून चिल्लर घेणे

मग दुकानदार 1-1 रूपयाचे 10 नाणी देईल व नोट घेईल ।

इथे 1 दशक = 10 एकक हे  समजावणे

10 नाणी एकक घरात ठेवणे  ।
एकक घरात अगोदरचे 2 क्रास / करून
2+10= 12 वर लिहिणे

आता मुलाला विचारायचे की  तु आता 6 रूपये देवू शकतो ना ?

उत्तर -होय

मग तो 6 रूपये खालच्या घरात देईल व उर्वरीत 6 नाणी  रेषेच्या खाली ठेवेल व 6-संख्या लिहील.

✍ आता दशक घरात 10 च्या 9 नोटा आहेत त्यातून 5 नोटा देईल म्हणजेच खालच्या घरात  देईल व उर्वरीत 4 नोटा रेषेच्याखाली ठेवेल व 4 संख्या लिहील;

✍ आता शतक घरात 3 शंभर च्या नोटा आहेत
त्यातून 2 नोटा खालच्या घरात देईल व उर्वरीत 1 नोट रेषेच्या खाली ठेवेल व 1 संख्या लिहील  . 
मग खाली किती रूपये उरले असे मुलांना विचारायचे

शंभर 1 नोट-       100
दहाच्या 4-            40
एक रूपयाची -      06
--------------------+---------
                        146 रूपये उरले 

संख्या पण लिहिल्यामुळे 146 सांगतील

✍  मग  लगेच पडताळा घेतला तर दुधात साखर!
     256
+   146
  ------------
     402

जर बेरीज 402 येत नसेल तर वजाबाकी चुकल्याचे सांगणे व पुन्हा सराव
हे करताना नोटाचे रूपांतरण चिल्लर चे ठोक करणे या बाबी करणे
एकंदरीत व्यावहारिक स्वरूप देणे
हे प्रात्यक्षिक वर्गातील मुलांकडून करून घेतले तर नक्कीच मुलांच्या
चेह-या वर ज्ञानाचा आनंद पाहावयास मिळेल व जी मुले 0 चा संबोध मध्ये अनेकदा चुका करतात त्यांचे संबोध स्पष्ट होईल 
प्रत्यक्ष व्यवहार कळेल
दैनंदीन जीवनाशी संबंध जोडला जाईल
गणिताची भीति दुर होईल व संपादणूकता वाढेल ;

हा उपक्रमाची अमलबजावणी मागील अनेक वर्षापासून चालु आहे .निश्चीतच गोड फळे चाखावण्याची संधी मिळतेय .
      🙏🙏🙏धन्यवाद!
          मुसा शेख
         साधनव्यक्ती
      BRC:RAJURA

1 टिप्पणी: