सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

सोमवार, ४ एप्रिल, २०१६

मी राबविलेला मीना राजु मंच उपक्रम वनिता वंजारी विषयतज्ञ ठाणे मनपा

आपण आज बघतोय की आजची स्त्री शिक्षीका डाँक्टर,अभियंता,खासदार ते राष्ट्रपती,कल्पना चावला ते वैज्ञानिक आणि रिक्षा ड्राइवर म्हणजे सर्वच पदांवर पुरूषांइतके चांगले काम करतेय गेल्या 10वर्षात 10वी12वीत मुलांपेक्षा मुलीच मेरीटमध्ये बाजी मारताय एकीकडे हा चढता आलेख तर दुसरीकडे स्रीयांवर होणारे दर तासाला 2अत्याचार यासाठीच मीनाराजु मंच हा कार्यक्रम आपल्याकडे शाळांमध्ये राबविण्यासाठी आला मागील 3/4 वर्षापासुन याचे training राज्यस्तरावर घेत होते व जिल्हास्तरावर देऊन प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम राबवित होतो आपल्याकडे येणारे विद्यार्थी हे तळागाळातील 6ते14वयांचे म्हणुन आतापासुन च जर त्यांच्यात स्त्री-पुरूष हा भेदभाव नको तर त्यांच्याकडे एक माणुस म्हणुन बघायला हवे तरच हे शक्य होईल.माझ्याकडे मुंब्रासारखा दुर्गम मुस्लिम समाजाची मुले त्यांना तर बदलाची खुप गरज म्हणुन सुरूवात तर केली पण अडचणी खुप होत्या या आव्हानांना सामोरे जाऊन माझ्या मुख्याध्यापकांच्या साहाय्याने आम्ही कामाला सुरुवात केली प्रथम मीना राजु मंच स्थापन करुन यातील विद्यार्थ्यांना ज्या मुली सतत गैरहजर त्यांना आणायला सांगितले व बक्षिस दीले.मीना बाजार ,मुलींना स्वयरोजगारासाठी मेहंदी,रांगोळी व शिवण काम,भरतकाम आणि कागदांपासुन कानातले बनविण्याचे प्रात्याक्षिक घेतले आज आमच्या शाळेच्या मुली टाकाऊ तुन टिकाऊ वस्तु बनवुन सणांना त्यांची विक्री करतात.आणि या सर्व कामात मुले पण सोबत असतात ते स्रीयांकडे आता एक व्यक्ती म्हणून बघत आहेत.मुली कराटे च प्रशिक्षण घेत आहेत.व सर्वांनी मिळुन हस्तलिखीत केलेय स्वताचे त्यात कविता,चारोळी,लेख व त्यांच्या क्षेत्रातील विविध महीलांची माहिती घेऊन त्यांनी हे यश कसे संपादन केले याची विस्तृत माहिती दिलेली आहे.
मुलींवर आधारीत घोषवाक्य तयार केलेली आहेत आज आमच्या मुली उत्तुंग भरारी घेत आहेत त्यांना साथ हवी आपल्यांची शेवटी मैने छोड दिए सारे बंधन तभी तो मिला पुरा गगन...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा