ज्ञानरचनावाद "पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद म्हणतात "
वैशिष्ट्ये :--
1⃣घोकंपट्टीपासून सुटका :- आकलन करून समजुन अभ्यास करता येतो .
2⃣शाळेबाहेरचे जग आणि शाळेतील शिकणे यांची सांगड घालता येते
3⃣अध्ययन कौशल्यांचा विकास :- श्रवण , भाषण, वाचन , लेखन ,संभाषण , अभिव्यक्ति या कौशल्याचा विकास करणे सोपे होत
4⃣नविन माहिती पूर्वज्ञानाशी जुळणारी असेल तर पूर्वीच्या ज्ञानात भर पड़ते .
5⃣आंतरक्रियेमुळे ज्ञाननिर्मितीला फायदा होतो. 📕📙 पाठ शिकवताना खालील कृती अवश्य करून घ्याव्यात....
1⃣
पाठ एक दिवस आधी वाचुन येण्यास सांगा
2⃣पाठ मधील चित्र दाखवून मुलांचे गट👭👬 करून चर्चा घडवून आणा.
3⃣झालेली चर्चा प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 सांगण्याची संधी दया .
4⃣गटात चित्रावर आधारित पाच सहा ओळी माहिती लिहिण्यास सांगा
5⃣प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 माहिती वाचण्यास सांगा
6⃣पाठाचा आशय स्पष्ट करून सांगा . चर्चा घडवून आणा .
7⃣योग्य तेथे साहित्याचा📚 वापर करा .
8⃣नविन शब्दाचा वाक्यात उपयोग करून घ्या 9⃣संवादात्मक पाठ मुलांना पात्र देवून नाटयीकरणाद्वारे सादर करून घ्या .
1⃣0⃣ कविता साभिनय सादर करून घ्या . ↪आपल्या भूमिकेत थोडा बदल करून शिकणे ही क्रिया अधिक मनोरंजक करू या . आपण कमी बोलून मुलाना बोलते करून त्यांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दया .
पृष्ठे
सोमवार, २१ डिसेंबर, २०१५
न्यानरचनावाद व्याख्या व वैशिष्ट्ये
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सामान्य पणे थोडक्यात माहिती देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे
उत्तर द्याहटवाअधिक माहिती द्यावी
शिक्षण विभागातील प्रत्येक पदे त्यांची कार्य व जबाबदारी
शिक्षण विभागातील प्रत्येक योजना
विध्यार्थी लाभ आणि विकासाच्या योजना यांचाही समावेश ब्लॉग वर करावा
विकास चव्हाण
सा व्य लातूर