डिजीटल शाळा तयार करायची म्हणजे नेमके काय करायचे, हा प्रश्न सर्व सामान्य शिक्षकाला पडताे या सगळ्या गाेष्टीचा विचार करून हि माहिती लिहीत आहे, मित्र हाे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत आनेक शाळा डिजीटल हाेवू पाहता आहेत हे सर्व अभिनंदनीय आहे, खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळानी कात टाकून पून्हा जाेमाने गुणवत्ता पूर्ण शिक्षणाच्या दिशेने घाैडदाेड शुरू केली आहे, याचे सर्व श्रेय मा.नंदकुमार साहेबांचा (प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य.)अथक प्रयत्नांना जाते, त्यांनी पाहिलेले प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न कुठेतरी साकार हाेण्याच्या दिशेने वेगाने धावू लागले आहे, डिजीटल शाळा तयार करण्यासाठी नेमके काेणते साहित्य खरेदी करावे व कुठून करावे ते साहित्य चांगल्या कंपनी चे आहे किंवा नाही ते भारतीय का चायना बनावटीचे आहे, असे आनेक प्रश्न आपणास पडतात, त्या साठी खालील बाबीचा विचार करावा. (डिजीटल शाळेचे साहित्य)
⭕ प्रोजेक्टर डिजीटल शाळा तयार करतांना सर्वात जास्त महत्वाचा पार्ट म्हणजे प्राेजेक्टर ताे कसा निवडावा
१) पेराेजेक्टर हा ब्रान्डेड च असावा जसे डेल, इपसन, बेनक्यू, साेनी, अँसर इत्यादी.
२) त्याचा लुमिनंस २७००व च्या पूढे आसावा
३) कंपनीची आँन साईड वाँरंटी आसावी
⭕ इंन्टरँक्टीव स्मार्टबाेर्ड ४ बाय ६ साईज चा बाेर्ड आसावा ताे निवडतांना काय काळजी घ्याल
१) स्मार्टबाेर्ड निवडतांना ताे १००% मेड इन इंडिया च आसावा,ताे कसा आेळखावा इंडियन स्मार्टबाेर्ड हा वजनदार आसताे साधारणता ३० ते ३५ किलाे चा दमदार आसताे
२) मेड इन चाइना स्मार्टबाेर्ड हा कमी वजनाचा आणि पाेकळ आसताे, टच व्यवस्थित काम करत नाही, ई पेन व्यवस्थित चालत नाही
३) स्मार्टबाेर्ड फिंगर टच, क्रैचप्रूफ, सिरेमिक, आसावा
⭕ कंम्प्यूटर / संगणक (CPU) संगणकात काय बेसिक्स गाेष्टी आसाव्यात.
१) डुअल काेअर, २ जीबी रँम, ५०० जीबी हारडीक्स, इंटेल प्रोसेसर, चांगल्या कंपनीचे मदरबाेर्ड इ.
२) चायनीज संगणक नसावा लवकर खराब हाेताे
⭕ सिलिंग माउंट किट
⭕ VJA CABLE १५ मिटर
⭕ स्पिकर
१) स्पिकर २.१ असावेत त्यात ते ब्रान्डेड आसावेत
२) ब्रान्डेड स्पिकर जसे आय बाँल, इंनटेक्स, साेनी, क्रिएटिव इ
⭕ कि बाेर्ड व माऊस
१) कि बाेर्ड व माऊस हा वायरलेस सेट आसावा
२) कारण वर्गाच्या प्रत्येक काेपर्यातून वापरता येताे
⭕ UPS पावर सेवर आसावे
⭕ लाईट फिटींग
१) शक्यताे प्रशिक्षित वायरमन कडूनच करा
२) आरर्थिंग करून घ्यावे
⭕ अभ्यासक्रम
१) १ ली ते ७ वी आभ्यासक्र टाकून घ्यावा
२) आभ्यासक्र डिजीटल अँनिमेटेड आसावा
⭕ सर्व्हिस
१) फक्त डिजीटल शाळेचे साहित्य विकून माेकळा हाणारा विक्रेता नसावा, नियमित सर्व्हिस देणारा आसावा
२) डिजीटल शाळेच्या साहित्याची माहीती प्रामाणिक पणे ग्राहकाला सांगणारा आसावा
३) डिजीटल शाळेत अध्यापन कसे करावे याचे प्रशिक्षण त्याने शिक्षकांना दिले पाहिजे
⭕ फसव्या जाहिरातींन पासुन सावधान,
१) वरिल बाबीन वर खरे उतरणारेच डिजीटल शाळेचे साहित्य खरेदी करा
२) शक्यताे All IN ONE.मशीन खरेदी करू नका, एकतरी सिस्टीम बंद पडल्यावर संपूर्ण संच बंद पडताे
३) All IN ONE मशीन मध्ये काेणत्या कंपनीचे साहित्य वापरले आहे हे कळत नाही, गँरटी चा प्रश्न उद्भवताे,
वरील माहीती चा आभ्यास करूनच डिजीटल शाळा तयार करतांना साहित्य खरेदी करावे, फसवणूक हाेणार नाही, धन्यवाद मित्र हाे.
*आपला स्नेही *
⭕ मनाेहर वाघ सर ⭕
साधनव्यक्ती
शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र संम्पर्क 9763236070
ई मेल waghsirjishirpur@gmail.com
माझी वेबसाइट www.smartclassrooms.in
माझा ब्लॉग manoharwaghsir.blogspot.com
खूपच सोप्या शब्दात मोलाचे मार्गदर्शन केले सर आपण Thank you
उत्तर द्याहटवा