सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

भामरागड तालुका स्तरीय शालेय बाल क्रिडा

*🏃‍♀भामरागड👉तालुका स्तरीय शालेय बाल क्रिडा स्पर्धा.*
               तथा
       *सांस्कृतिक सम्मेलनाचा उदघाटनिय सोहळा उत्साहात,आनंदोत्सवात संपन्न.*



*🔲दिनांकः-१३,१४ व १५ डिसेबर-२०१७*
शिक्षण विभाग पं.स भामरागड

*🏝स्थळः-समुह निवाशी शाळा ता.भामरागडच्या भव्य पटांगणावर.*
●●●●●●●●●●●●●●●●●●
*🌹समारंभाचे उदघाटकः-*मा.अॅड.लालसुभाऊ नागोटी सर सदस्य जि.प गडचिरोली.
*🌹अध्यक्षः-*मा.सुखरामजी मडावी साहेब सभापती पं.स भामरागड.
*🌹प्रमुख अतिथीः-*मा.श्री कैलास अंडील सर तहसिलदार भामरागड,मा.श्रीमती ग्यानकुमारी कौशीक सदस्या जि.प गडचिरोली,मा श्री किशोर कज्जलवार सर BDO भामरागड,मा श्रीमती प्रमिलाताई कुड्यामी उपसभापती भामरागड,मा.श्री राजुभाऊ वड्डे नगराध्यक्ष,मा श्रीमती अश्विणी सोणावणे मॅडम BEO भामरागड,मा.सौ समिक्षाताई आमटे संचालिका लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा,श्रीमती बेबीताई पोरतेट,श्रीमती रंजुताई सेडमेख नगरसेविका,श्री सब्बरबेग मोगल आदिवासी सेवक,सौ.अंडील मॅडम,सर्व केंद्रप्रमुख,सर्व बिआरसी कर्मचारी व इतर मान्यवर.
■■■■■■■■■■■■■■
संकलन/उपस्थित✍
चांगदेव सोरते साधनव्यक्ती भामरागड.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*🏞वैशिष्टपुर्ण बाबी.🏞*
👇
◀क्रिडाज्योत प्रज्वलन.
◀पाहुण्यांना मानवंदना.
◀खेडाळू व पंचाना शपथविधी.
◀पाहुण्यांचा स्वागतसोहळा.
◀वैविध झाक्यांचे प्रदर्शन.
◀पाहुण्यांचे मार्गदर्शन.
〰〰〰〰〰〰〰〰
पंचांना शपथविधी कु शालु गेडाम मँडम यांनी दिली तर विद्यार्थ्यांना शपथविधी व समारंभाचे सुत्रसंचालन श्री विनोद पुसलवार सर यांनी केले.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*🔰झांकी सादरीकरणात👉* समुहनिवासी शाळा,राणीपोद्दुर,कोयनगुडा,मेडपल्ली,कियर व KGBV च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक अशा कलागुणांचा आविस्कार दाखवित उपस्थित बहूसंख्य जनसमुदायांचे मने जिंकली.शिक्षक बांधवांनी घेतलेल्या परीश्रमाचे फलीत हे मुलांच्या नृत्यांव्दारे दिसुन आले.टाळ्यांच्या मोठ्या गजरात मुलांना प्रोत्साहीत करण्यात आले.सहभागी सर्व मुले आनंदाने नाचु लागली.
*************************
*📗मान्यवरांचे मार्गदर्शनः-*सोहळ्याचे प्रास्ताविक मा.श्रीमती अश्विणी सोणावने मॅडम यांनी केले,सर्व विद्यार्थ्यांनी खिलाडु वृत्तीतुन खेळावे,आपल्या विविध प्रकारच्या कलांचा वापर करून जिंकणे हा उद्धेश न ठेवता,खेळांचा आनंद घ्या.असे मौलिक विचार आपल्या प्रास्ताविकात सोणावणे मॅडम यांनी व्यक्त केले.
*श्री सब्बर बेग* आदिवासी सेवक यांनी आपल्या विनोदी शैलीने माडीया भाषेत विचार व्यक्त केले. *सौ.समिक्षाताई आमटे* यांनी आपल्या मार्गदर्शनात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करून गुणवत्ता विकासाच्या प्रवासात आम्ही सोबत असल्याचे मत व्यक्त केले. *श्री किशोर गज्जलवार सर* यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षकांना प्रेरणा देत तालुक्यातीत शैक्षणिक बदलाचे अभिनंदन करीत शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी खचुन जाऊ नका,काम करणाराच व्यक्ती चुकतो,चुका सुधारून प्रामाणिक प्रयत्न करीत राहुन,भामरागड तालुक्याचा नाव राज्यात उंचावण्याचा आशावाद व्यक्त केला. *श्रीमती ग्यानकुमारी कौशीक मॅडम* यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे समारंभाचे उदघाटक *श्री अँड लालसु नागोटी* यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करीत भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिकावं व आपल्या निरक्षर आई-वडिलांचं नाव चमकावं असे मत व्यक्त केले.आदिवासींचे जीवन बदलविण्यासाठी शिक्षणासारखा दुसरा मार्ग नाही,अज्ञानावर प्रहार,जीवनातील विविध यश हे केवळ शिक्षणामुळेच प्राप्त होऊ शकतात,मी आज तुमच्यासमोर उभा आहे वा बोलत आहे हे केवळ शिक्षणामुळे शक्य झाले.असा मौलिक संदेश विद्यार्थी-शिक्षक-पालक व उपस्थितांना दिला.
         समारंभाचे अध्यक्षः- *श्री सुखरामजी मडावी* यांनी भामरागड तालुक्यातील शैक्षणिक बदलाबाबत समाधान व्यक्त करीत सर्वांनी अधिक प्रयत्न करून तालुक्यांचे नाव उंचावुया,आपणा सर्वांना खुप खुप शुभेच्छा.
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*🌳समारंभ यशस्वी करण्यासाठी श्री पंचफुलीवार सर,श्री गोमासे सर,श्री नेवलकर सर,श्री केंद्रे सर,श्री मंडल सर,श्रीमती भराडे मँडम,श्री तुलावी सर,श्री पदमावार सर,श्री सोमवंशी सर,श्री चावरे सर,श्री चांदेकर सर,श्री वाचामी सर,श्री टेंभुर्णे सर यांनी व तालुक्यातील इतर शिक्षकबांधव तथा भगिंणींनी परिश्रम घेतले.*

बुधवार, २० जुलै, २०१६

एक विशेष शाळा भेट विषय साधनव्यक्ती श्री सदाशिव जाधव (लातूर)





 एकूण सात दत्तक शाळेपैकी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगापूर या दत्तक शाळेस भेट  देऊन  मूल समजून घेताना या विषयावर शाळेतील सर्व शिक्षकांना व विद्यर्थ्यांना सुलभक म्हणून माहितीचे समुपदेशन करण्यात आले. 




जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंकोली  या दत्तक शाळेस भेट  देऊन  मूल समजून घेताना या विषयावर शाळेतील सर्व शिक्षकांना व विद्यर्थ्यांना सुलभक म्हणून माहितीचे समुपदेशन करण्यात आले.  


श्री सदाशिव जाधव 
विषय साधनव्यक्ती (लातूर)



बुधवार, १३ जुलै, २०१६

चला नविन काही शाेधूया

http://sandipudapurkar.blogspot.in/p/blog-page_20.html?m=1

महाराष्ट्र राज्य तील सर्व शाळा साठी महत्वपूर्ण

रविवार, १० जुलै, २०१६

डिजीटल शाळा कशी काय तयार करायची?

डिजीटल शाळा तयार करायची म्हणजे नेमके काय करायचे, हा प्रश्न सर्व सामान्य शिक्षकाला पडताे या सगळ्या गाेष्टीचा विचार करून हि माहिती लिहीत आहे, मित्र हाे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत आनेक शाळा डिजीटल हाेवू पाहता आहेत हे सर्व अभिनंदनीय आहे, खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळानी कात टाकून पून्हा जाेमाने गुणवत्ता पूर्ण शिक्षणाच्या दिशेने घाैडदाेड शुरू केली आहे, याचे सर्व श्रेय मा.नंदकुमार साहेबांचा (प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य.)अथक प्रयत्नांना जाते, त्यांनी पाहिलेले प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न कुठेतरी साकार हाेण्याच्या दिशेने वेगाने धावू लागले आहे, डिजीटल शाळा तयार करण्यासाठी नेमके काेणते साहित्य खरेदी करावे व कुठून करावे ते साहित्य चांगल्या कंपनी चे आहे किंवा नाही ते भारतीय का चायना बनावटीचे आहे, असे आनेक प्रश्न आपणास पडतात, त्या साठी खालील बाबीचा विचार करावा. (डिजीटल शाळेचे साहित्य)
⭕ प्रोजेक्टर डिजीटल शाळा तयार करतांना सर्वात जास्त महत्वाचा पार्ट म्हणजे प्राेजेक्टर ताे कसा निवडावा
१) पेराेजेक्टर हा ब्रान्डेड च असावा जसे डेल, इपसन, बेनक्यू, साेनी, अँसर इत्यादी.
२) त्याचा लुमिनंस २७००व च्या पूढे आसावा
३) कंपनीची आँन साईड वाँरंटी आसावी
⭕ इंन्टरँक्टीव स्मार्टबाेर्ड ४ बाय ६ साईज चा बाेर्ड आसावा ताे निवडतांना काय काळजी घ्याल
१) स्मार्टबाेर्ड निवडतांना ताे १००% मेड इन इंडिया च आसावा,ताे कसा आेळखावा इंडियन स्मार्टबाेर्ड हा वजनदार आसताे साधारणता ३० ते ३५ किलाे चा दमदार आसताे
२) मेड इन चाइना स्मार्टबाेर्ड हा कमी वजनाचा आणि पाेकळ आसताे, टच व्यवस्थित काम करत नाही, ई पेन व्यवस्थित चालत नाही
३) स्मार्टबाेर्ड फिंगर टच, क्रैचप्रूफ, सिरेमिक, आसावा
⭕ कंम्प्यूटर / संगणक (CPU) संगणकात काय बेसिक्स गाेष्टी आसाव्यात.
१) डुअल काेअर, २ जीबी रँम, ५०० जीबी हारडीक्स, इंटेल प्रोसेसर, चांगल्या कंपनीचे मदरबाेर्ड इ.
२) चायनीज संगणक नसावा लवकर खराब हाेताे
⭕ सिलिंग माउंट किट
⭕ VJA CABLE १५ मिटर
⭕ स्पिकर
१) स्पिकर २.१ असावेत त्यात ते ब्रान्डेड आसावेत
२) ब्रान्डेड स्पिकर जसे आय बाँल, इंनटेक्स, साेनी, क्रिएटिव इ
⭕ कि बाेर्ड व माऊस
१) कि बाेर्ड व माऊस हा वायरलेस सेट आसावा
२) कारण वर्गाच्या प्रत्येक काेपर्यातून वापरता येताे
⭕ UPS पावर सेवर आसावे
⭕ लाईट फिटींग
१) शक्यताे प्रशिक्षित वायरमन कडूनच करा
२) आरर्थिंग करून घ्यावे
⭕ अभ्यासक्रम
१) १ ली ते ७ वी आभ्यासक्र टाकून घ्यावा
२) आभ्यासक्र डिजीटल अँनिमेटेड आसावा
⭕ सर्व्हिस
१) फक्त डिजीटल शाळेचे साहित्य विकून माेकळा हाणारा विक्रेता नसावा, नियमित सर्व्हिस देणारा आसावा
२) डिजीटल शाळेच्या साहित्याची माहीती प्रामाणिक पणे ग्राहकाला सांगणारा आसावा
३) डिजीटल शाळेत अध्यापन कसे करावे याचे प्रशिक्षण त्याने शिक्षकांना दिले पाहिजे
⭕ फसव्या जाहिरातींन पासुन सावधान,
१) वरिल बाबीन वर खरे उतरणारेच डिजीटल शाळेचे साहित्य खरेदी करा
२) शक्यताे All IN ONE.मशीन खरेदी करू नका, एकतरी सिस्टीम बंद पडल्यावर संपूर्ण संच बंद पडताे
३) All IN ONE मशीन मध्ये काेणत्या कंपनीचे साहित्य वापरले आहे हे कळत नाही, गँरटी चा प्रश्न उद्भवताे,
    वरील माहीती चा आभ्यास करूनच डिजीटल शाळा तयार करतांना साहित्य खरेदी करावे, फसवणूक हाेणार नाही, धन्यवाद मित्र हाे.

          *आपला स्नेही *
      ⭕ मनाेहर वाघ सर ⭕
           साधनव्यक्ती
शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र संम्पर्क 9763236070
ई मेल waghsirjishirpur@gmail.com
माझी वेबसाइट www.smartclassrooms.in
माझा ब्लॉग manoharwaghsir.blogspot.com

मराठी भाषा कार्यशाळा संपन्न

⭕ प्रगत शै.महाराष्ट अंतर्गत **                                                आज दि.९/७/२०१६रोजी,         जि.शि.प्र.संस्थ(रहाटोली)ठाणे यांचा मार्गदर्शनाने अंबरनाथ गट साधन केंद्रातील साधनव्यक्तीनी मुळगांव  पि़पळोली.व बोराडपाडा या  केंद्रात भाषा विषयाची कार्यशाळा घेतली.
*डायटचे अधिव्याख्याते.मा.डॉ.दिनेश चौधरी सर पंचायत समितीचे जेष्ट विस्तार अधिकारी मा.शिवाजी सोनवणे साहेब , केंद्रप्रमुख श्री पाटील सर व श्रीमती.बोरसे मँडम.  यांचा उपस्थितीत संपन्न.झाला.
*साधनव्यक्ती श्री बोरसे सरांनी कार्यशाळेची प्रस्तावना व हेतू स्पष्ट केला.
*शिक्षकांचा उत्कुष्ट प्रतिसाद.
⭕ साधनव्यक्तीचा नियोजनब्द व अभ्यासपुर्ण तसेच शै.साहित्याच विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व शिक्षकांकडून कौतुक. मा.डॉ.श्री.दिनेश चौधरी सराचे.अनमोल मार्गदर्शन.
⭕ शाळा प्रगत लवकरच करणार  शिक्षकांनी दिली.ग्वाही़.विशेष म्हणजे सकाळी शाळा करूनही कार्यशाळेत  पुर्णवेळ दिला.
⭕ सदर कार्य शाळा सर्व साधव्यक्ती श्री.भगवान बेारसे ,संजय जाधव,प्रवीण कदम,लक्ष्मी भोसले,सुनिता रणदिवे व मंगेश म्हात्रे.यांनी यशस्वी करून डायट व  बी.आर.सी.महत्व दाखुन दिले.
संकलन-श्री.बोरसे भगवान. B.R P Diet. .अंबरनाथ ठाणे.
⭕ प्रसिद्ध व प्रचार
@ मनाेहर वाघ सर, साधनव्यक्ती, शिरपूर जिल्हा धुळे
⭕  9763236070

बुधवार, ६ जुलै, २०१६

डिजीटल शाळेत कसे अध्यापन करावे

डिजीटल शाळेत कसे अध्यापन करावे या विषयांवर शिरपूर जिल्हा धुळे येथे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली, यात पेसा अंतर्गत गावातील शाळा सहभागी झाल्या होत्या, यात मनाेहर वाघ सर यांची मँरेथाँन तीन तास मार्गदर्शन मिळाले यावेळी शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकबांधव माेठ्या संख्येत उपस्थित हाेते,